पुण्यात शिवसेनेला जबर धक्का ! शिवसेनेचा बडा नेता जाणार शिंदे गटात

Pune – महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात राज्यकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या बंडखोर गटाचा पाठींबा वाढत असल्याचे दिसत असताना आता शिवसेनेसाठी (Shivsena) आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे देखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.

याबाबत शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तालुक्यातील कामे होत नाहीत, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची युती (Congress alliance with NCP) तोडावी अशी भूमिका शिवतारे यांनी जाहीर केली. अगदी हीच भूमिका शिंदे गटाची आहे. दरम्यान एकनाथ शिंदेसह आमदार सुरतला गेले होते, त्यावेळी आपण व्हॉट्स ऍपवरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) , वरुण सरदेसाई यांना पत्र पाठवून भूमिका मांडली होती. मात्र आपल्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

शिवतारे म्हणाले की, एकनाथ शिंदेंची भूमिका ही संघटनेसाठी आहे. त्यामुळे आम्ही शिंदे यांच्यासोबत जाणं आवश्यक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावू नका, अशी विनंती सर्वांनी केली आहे. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ती मान्य केली नसल्याचंही शिवतारे यांनी नमूद केलं.