मुंबई इंडियन्सचा ‘हा’ खेळाडू टीम इंडियासाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरेल, हरभजन सिंगने केली मोठी भविष्यवाणी

WTC FINAL : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल. त्याच वेळी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन काय असेल? हा प्रश्न कायम आहे. मात्र, आता भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामी देतील, असा विश्वास भारताचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने व्यक्त केला. तर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. तो म्हणाला की, चेतेश्वर पुजाराने कौंटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजीचे दृश्य सादर केले. अशा परिस्थितीत डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत शानदार फलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे.

माजी दिग्गज फिरकीपटूने विराट कोहलीला त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथ्या क्रमांकासाठी निवडले आहे. त्याचबरोबर या खेळाडूने अजिंक्य रहाणेला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले आहे. यानंतर बोलताना तो म्हणाला, मला इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये बघायचे आहे. इशान किशनमध्ये सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता आहे, हा खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये गेम चेंजर ठरू शकतो, असा विश्वास हरभजन सिंगला वाटतो.

WTC फायनलसाठी हरभजन सिंगचा प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रहाणे, इशान किशन, रवींद्र जडेजा, अश्विन, शार्दुल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमेश यादव.