KL Rahul | ‘आयपीएल संघात राजकारण असेल तर भारतीय टीममध्येही…’, केएल राहुलने जस्टिन लँगरला प्रशिक्षक होण्यापासून रोखले!

KL Rahul | भारतीय क्रिकेट संघ नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषकानंतर संपत आहे. मात्र, भारतीय संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अनेक नावे पुढे येत आहेत. पण दरम्यान, यासंबंधीची मोठी माहिती समोर येत आहे. वास्तविक, रिकी पाँटिंग, स्टीफन फ्लेमिंग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यानंतर आता जस्टिन लँगरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर नाकारली आहे. तसेच जस्टिन लँगरने सांगितले की, त्याने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर का नाकारली?

‘आयपीएल संघात दबाव आणि राजकारण आहे असे तुम्हाला वाटत असेल तर…’
जस्टिन लँगरच्या म्हणण्यानुसार, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल  ( KL Rahul) म्हणाला, तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला वाटत असेल की आयपीएल संघात दबाव आणि राजकारण आहे, तर ते भारतीय संघाच्या कोचिंगमध्ये हजारपट जास्त आहे. त्याचवेळी आता जस्टिन लँगर म्हणाला की, मला वाटते केएल राहुलने चांगला सल्ला दिला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर नाकारली होती. रिकी पॉन्टिंग म्हणाला होता की, मला टीम इंडियाचा वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून काम करायला आवडेल पण मला माझ्या आयुष्यात थोडा वेळ हवा आहे. त्यामुळे मी यावेळी तयार नाही.

‘तुम्ही भारतीय प्रशिक्षक झालात तर…’
रिकी पॉन्टिंग पुढे म्हणतो की, जर तुम्ही भारतीय प्रशिक्षक झालात तर तुम्ही आयपीएलमध्ये प्रशिक्षक होऊ शकणार नाही आणि मला त्यातून बाहेर पडावे लागेल. याशिवाय नॅशनल कोच असणं म्हणजे 10 ते 11 महिने काम करावं लागेल. मला हे काम आवडले असते आणि जेव्हा मी माझ्या मुलाला हे सांगितले तेव्हा तो लगेच म्हणाला, पापा, तुम्ही ते घ्या. पण हे माझ्या जीवनशैलीत बसत नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप