स्विमिंग पूलमध्ये बिकिनी घालणार नाही मग कुठे घालणार?, मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली

Tejaswini Pandit: मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सातत्याने कोणत्या ना कोणत्या विषयावर आपले मत मांडत असते. अभिनयाबरोबरच आपल्या वक्तव्यांमुळेही ती चर्चेत राहते. नुकतेच तिने मराठी अभिनेत्रींनी छोटे कपडे घालावेत की नाही?, यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्विमिंग पूलमध्ये बिकिनी घालणार नाही तर मग कुठे घालणार? अशा स्पष्ट शब्दांत तिने ट्रोल करणाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.

तेजस्विनी पंडीतने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत मराठी अभिनेत्रींच्या बिकिनी घालण्याबद्दल आपलं परखड मत मांडलं आहे. तेजस्विनी म्हणाली,”सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनवर पैसे आकारायला हवेत. प्रत्येक कमेंटचे दहा रुपये. तरचं या गोष्टी बदलू शकतात. माझं शरीर चांगलं आहे. मला आवडतात हे कपडे. जर मी असे कपडे घातले तर त्याच काहीच गैर नाही”.

तेजस्विनी पुढे म्हणाली,”स्विमिंग पूलमध्ये बिकिनी घालणार नाही मग कुठे घालणार? जगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत तुमच्या पद्धतीने आणि दुसरी लोकांच्या पद्धतीने. मग तसं वागलं पाहिजे. बिकिनी घातली घातलेले फोटो सोशल मीडियावर टाकल्यास त्या फोटोखालील कमेंट पाहायच्या नाहीत. नेटकऱ्यांनी ट्रोल केलं तरी त्या गोष्टीचा फरक पडला नाही पाहिजे. नाहीतर मग लोकांना हवं तसं वागा”.

https://youtu.be/_O7XOEdnngI?si=dWo8PCZVDaXHz5wr

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ