Uddhav Thackeray | ठाकरेंच्या अडचणी वाढणार ? ECने दिले ‘त्या’ पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेश

Uddhav Thackeray | शिवसेना(उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह भाजपला टार्गेट केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

मुंबईत मतदानात झालेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले होते. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी सेना भवनमध्ये संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केला. सोबतच निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला होता.

यानंतर आता उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) संपूर्ण पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासून पाहणार आहेत. यात काही वादग्रस्त असेल तर उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे आता निवडणूक आयोग विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष देखील पाहायला मिळू शकतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप