राज्य निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे संकेत; राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका 

मुंबई –  महापालिका निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगानं राजपत्र जारी केले आहे. विधानसभा निवडणुकांसाठी असलेल्या मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार करण्याबाबत हे राजपत्र आहे. या राजपत्रात निवडणुका या सप्टेंबर 2023 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात एक परित्रपत्रक काढत मतदार यादीसंदर्भात महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा उल्लेख निवडणूक आयोगाच्या राजपत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होण्याची जोरदार शक्यता वर्तवण्यात येत आहे.