Nana Patole | चोराच्या उलट्या बोंबा! संविधान बदलाची भाषा भाजपाच करते, वरून काँग्रेसवर आरोप करतात

Nana Patole | काँग्रेस पक्ष संविधान बदलून धर्माच्या आधारावर आरक्षण देऊन ओबीसींचे आरक्षण हिरावणार असा खोटा प्रचार मोदी करत आहेत. भाजपानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, दलित, अल्पसंख्याक समाजाचा सतत अपमान केला, मोदी सरकारच्या काळातच या समाजावर प्रचंड अत्याचार करण्यात आले. भाजपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पायदळी तुडवले. संविधान बदलाची भाषा भाजपाच करते आणि वरून काँग्रेसवर आरोप करतात याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. ओबीसींचे राजकीय आरक्षण भारतीय जनता पक्ष,नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनीच घालवले आहे. राज्यात मराठा धनगर आदिवासी समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची फसवणूकही भाजपानेच केली आहे परंतु खोटे बोल पण रेटून बोल हीच भाजपाची निती आहे, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहे.

ते पुढे म्हणाले, इंडिया आघाडीचे सरकार आले की पैसे मिळवण्याचा त्यांचा मनसुबा आहे, सरकार बनाओ, नोट कमाओ, असे मोदी म्हणाले पण इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केली, मोदींची चोरी सुप्रीम कोर्टाने पकडली आणि आरोप मात्र इंडिया आघाडीवर करतात, हे मात्र अजब आहे. इंडिया आघाडीचा एकाही जागेवर विजय होऊ देऊ नका असे जाहीरपणे सांगणे ही हूकूमशाही वृत्ती आहे.पराभव दिसत असल्याने निराशेतून मोदी काहीही बडबड करत आहेत असेही नाना पटोले म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन