Bengaluru Rameshwaram Cafe blast | बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट, अपघातात अनेक जण जखमी

Bengaluru Rameshwaram Cafe blast : बेंगळुरूच्या राजाजीनगर येथील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला आहे. यादरम्यान अपघातात अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. बेंगळुरूमधील व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात किमान चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन कर्मचारी आणि एका ग्राहकाचा समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास एका बॅगेत ठेवलेल्या वस्तूचा स्फोट झाला. रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटानंतर व्हाईटफील्ड क्षेत्राचे पोलिस उपायुक्त घटनास्थळी पोहोचले. हा कॅफे बेंगळुरूमधील सर्वात लोकप्रिय फूड जॉइंट्सपैकी एक आहे.

व्हाईटफील्ड फायर स्टेशनने सांगितले की, आम्हाला रामेश्वरम कॅफेमध्ये (Bengaluru Rameshwaram Cafe blast) सिलेंडरचा स्फोट झाल्याचा फोन आला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो असून परिस्थितीचे निरीक्षण करत आहोत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल