Maharashtra Congress | मुस्लिमांची मते हवी, पण उमेदवार नको; काँग्रेसच्या नेत्याचा प्रचार न करण्याचा निर्णय

महाराष्ट्र काँग्रेसचे (Maharashtra Congress) कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून ही माहिती दिली. काँग्रेसने महाराष्ट्रातून एकही मुस्लिम उमेदवार न दिल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

नसीम म्हणाले, महाविकास आघाडीने (MVA) महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांवर एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नाही. युतीला फक्त मुस्लिमांची मते हवी आहेत. लोकसभा निवडणुकीत उरलेल्या जागांवर मी पक्षाचा प्रचार करणार नाही. मी प्रचार समितीचा राजीनामा देत आहे.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम (Maharashtra Congress) संघटना, नेते आणि कार्यकर्त्यांना काँग्रेस अल्पसंख्याक समाजातील एका उमेदवाराला तिकीट देईल अशी अपेक्षा होती, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. काँग्रेसला मुस्लिम मतं पाहिजे आहेत, पण उमेदवार नको का? असा प्रश्न विचारला जात आहे. मी या प्रश्नाचं उत्तर मुस्लिम जनतेला देऊ शकत नाही, त्यामुळे मी या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाही, असं नसीम खान यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन