कोणत्याही परिस्थितीत हेमंत रासने हेच निवडून येणार; उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला विश्वास 

Pune –  कसब्यात कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने अशी तगडी लढत बघायला मिळत आहे.  भाजप आणि महाविकास आघाडीसाठी कसब्याची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. राज्यात सत्तानंतर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराबाबत  दावे – प्रतिदावे करण्यासाठी या निवडणूक निकालाचा उपयोग होणार आहे.

दरम्यान, प्रत्येक पक्षाकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु आहे. यातच काल भाजपचे खासदार उदयनराजे आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ हे आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे म्हणाले की,कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणुक होत आहे. ताईंचं राहिलेलं उर्वरित काम हेमंत रासने हे करणार आहेत. या निवडणुकीत हेमंत रासने याना मतदार राजाकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता हेमंत रासने यांचा विजयी निश्चित असल्याच त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार म्हणाले की,कसबा मतदार संघात भाजपकडून कोणताही नेता आला तरी रविंद्र धंगेकर यांचा विजय निश्चित आहे.त्यावर उदयनराजे म्हणाले की,सर्व नेते मंडळी हेमंत रासने यांच्या प्रेमापोटी येत आहेत. तसेच निवडणुका आल्या की,प्रत्येक जण आपआपली बाजू मांडत असतो.तसेच त्यांना जे बोलायाच आहे.ते त्यांना बोलू द्या,पण आज पर्यंत काम का झाली नाही. लोक ठरवतील कोणाला निवडून आणायचं,पण कोणत्याही परिस्थितीत हेमंत रासने हेच निवडून येणार आहेत.त्याचबरोबर अजित पवार मोठा माणूस आहे. मला तर भविष्य काही सांगता येत नाही. मी वर्तमानात राहतो.  तसेच त्यांना भविष्य सांगण्याची सिध्दी प्राप्त झाली असेल तर मला त्यावर काही बोलायाच नसल्याची भूमिका त्यावर त्यांनी मांडली.