Sunil Tatkare | अल्पसंख्याक समाजाला चुकीचे सांगितले तरी हा समाज माझ्या पाठीशी ठाम उभा राहिल

Sunil Tatkare | जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या विरोधात अल्पसंख्याक समाजाला चुकीचे सांगितले तरी हा अल्पसंख्याक समाज माझ्या पाठीशी ठाम उभा राहिल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केला. गुरुवारी म्हसळा तालुक्यातील तीन पंचायत समिती गण आणि एक माणगाव तालुक्यातील गोरेगाव पंचायत समिती गणाची विराट सभा पार पडली.

गोरेगाव येथील जिजाऊ मैदानावर माझ्या ५० सभा झाल्या आहेत परंतु आज माझ्या त्या सभांपैकी सर्वात मोठी सभा जिजाऊ मैदानावर झाली आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रीय नेतृत्वाला आणून कोपर्‍यात सभा घेतली परंतु या विराट सभेने त्यांना प्रत्युत्तर मिळाले आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. या रायगडात सामाजिक सलोखा आम्ही जपला आहे. परंतु या पवित्र भूमीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम केले जात आहे असा थेट हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी केला.

जयंत पाटील तुम्ही शिवसेनेच्या पाया पडलात म्हणून तुम्हाला आमदार केले गेले. लोकसभेतून पक्षाला हद्दपार केले ही जयंत पाटील यांची अलौकिक कामगिरी असेल असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला. महायुतीने मुंबई महानगरपालिका ताब्यात घेतली तर मासा पाण्याबाहेर पडल्यावर तडफडतो तशी अवस्था उध्दव ठाकरे यांची होणार आहे तशीच अवस्था तर रायगडमधून शेकापलाही हद्दपार केल्यावर होणार आहे असा इशाराही सुनिल तटकरे यांनी दिला.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा नेते विकास गोगावले, संपर्क प्रमुख अरुण चाळके, सुभाष केकाणे, देवेंद्र गायकवाड, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सायली दळवी आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन