‘महायुतीचा उमेदवार 10 लाख मते घेत विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही’

Deepak Mankar – राम नामाच्या ताकदीमुळे काँग्रेसचे नेते घाबरले आहेत. काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यांना उमेदवार मिळतो की नाही अशी शंका आहे अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केली आहे.महायुतीचा उमेदवार दहा लाख मते घेतल्याशिवाय आणि विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या पुणे जिल्ह्याचा संयुक्त मेळावा आज डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉ न येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी मानकर बोलत होते.

दीपक मानकर यांनी प्रास्ताविक केले. हा मेळावा लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या विजयाची नांदी आहे. एका विचाराने सर्व नेते एकत्र आले आहे. त्यातून राज्याच्या विकासाला गती मिळत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने एकमेकांमध्ये समन्वयाचा प्रयत्न करण्यात आला. लोकसभेच्या ४८ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जो उद्योग केला, त्यामुळे त्यांना सोसावा लागला. आमच्या निर्णयाची आम्ही वाट बघतो आहोत. तो निर्णयही अजित पवारांच्या बाजूने लागल्याशिवाय राहणार नाही. पुण्याचा लोकसभेचा महायुतीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मताने निवडून आणायचा संकल्प करूयात. असे मानकर यांनी म्हटले आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, महेश लांडगे, राहुल कुल, उमा खापरे सिद्धार्थ शिरोळे, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, चेतन तुपे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शंकर जगताप, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, वासुदेव काळे, प्रदीप गारटकर, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले व प्रमोद भानगिरे, रिपाइंचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर,शिवसेना जिल्हा निरीक्षक किशोर भोसले, उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, रमेश कोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि आर पी आय चे ऍड.मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले.तर आभार प्रदर्शन शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच 73 हजारांच्या पार, निफ्टी 22 हजारांच्या वर

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका