IND vs AUS: इंदूरमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा बँड वाजवला, दुसरी वनडे 99 धावांनी जिंकली

IND vs AUS 2nd ODI Full Match Highlights: ऑस्ट्रेलियन संघाने (India vs Australia) इंदूरमध्ये भारतासमोर पूर्णपणे शरणागती पत्करली. शुभमन गिल (Shubman Gill), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या तुफानी फलंदाजीनंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या जादुई फिरकीच्या जोरावर भारताने दुसऱ्या वनडेत विजय मिळवला. यासोबतच टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेवरही कब्जा केला.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात प्रथम खेळून भारताने श्रेयस अय्यर (105), शुभमन गिल (104) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद 72) यांच्या शानदार खेळीमुळे 50 षटकांत 5 बाद 399 धावा केल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 9 षटकांनंतर पाऊस आला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 33 षटकांत 317 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. मात्र, ऑस्ट्रेलियन संघ केवळ 217 धावा करू शकला आणि भारताने 99 धावांनी सामना जिंकला.

पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला 144 चेंडूत आणखी 261 धावा करायच्या होत्या. डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन क्रीजवर होते. या दोघांनी सुरुवातीलाच वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन संघ सामना आपल्या बाजूने घेईल असे वाटत होते, पण त्यानंतर अश्विनने आपल्या जादुई फिरकीने सामना भारताच्या कुशीत नेला. भारताच्या तगड्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाने 140 धावांत आठ विकेट्स गमावल्या होत्या, पण शेवटी शॉन अॅबॉट आणि जोश हेझलवूडने पराभवाचे अंतर कमी केले.

अॅबॉटने 36 चेंडूंत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. त्याने जोश हेझलवूड (23) सोबत 9व्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. यापूर्वी ‘तू चल में आया’च्या धर्तीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद झाले होते. डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावले, पण तो अश्विनसमोर झुंजत होता. पण शेवटी अश्विनने कॅरम चेंडूने वॉर्नरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई महापालिकेचे भूखंड व उद्याने दत्तक देण्याचे धोरण रद्द करा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

वंचित बहुजन आघाडीचा Gautam Adani – Sharad Pawar भेटीवरून कॉंग्रेसला टोला !

ससूनमधील रुग्णांना ‘Virtual Reality’द्वारे ‘दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन