VBA – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी (Gautam Adani and Narendra Modi) यांच्या संबंधावर बोलत असतात. देशातील अनेक उद्योग अदानी समूहाच्या घशात टाकल्यामुळे मोदी सरकारवर वंंचित बहुजन आघाडी आणि विरोधकांकडून सातत्याने टीका होत असते. याच संदर्भात ट्वीट करत वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, राष्ट्रवादी ही भाजपची बी-टीम आहे का? प्रिय काँग्रेस, तुमच्या आवडत्या मित्राबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि उद्योजक गौतम अदानी यांच्या आजच्या भेटीवर वंचित बहुजन आघाडीने ट्वीट करत टोला लगावला आहे.
VBAने आपल्या अधिकृत एक्स अकौंटवरून म्हटले आहे की, आमचे नेते प्रकाश आंबेडकर जेव्हा दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या बोटचेपी भूमिकेवर टीका करतात, तेव्हा तुम्ही आमच्यावर टीका करतात. आज तुमचे आवडते मित्र (शरद पवार) आनंदाने त्यांचे नातेसंबंध एका देश लुटणाऱ्या भांडवलदाराशी शेअर करत आहे, ज्याच्या विरोधात तुम्ही प्रचार करतायेत. तुमचा आयटी सेल आता शरद पवारांना ट्रोल करणार नाही का किंवा तुमचे नेते राष्ट्रवादीला भाजपची बी-टीम म्हणणार नाहीत का? तुम्हाला पाठीचा कणा आहे का? किंवा तुमचे सर्व राजकारण दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम यांच्या स्वतंत्र आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांवर हल्ला करण्यासाठी राखून ठेवलेले आहे, असं म्हटलं आहे.
https://x.com/VBAforIndia/status/1705533337916276792?s=20
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही ट्वीट करत याविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, काँग्रेस भाजपपेक्षा वेगळी असती, तर त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला भाजपची बी-टीम म्हटले असते किंवा, हे केले असते असं म्हणत राहुल गांधी यांचा संसदेतील फोटो शेअर करत कॉंग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=FA8bsQpyrSM
महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात
‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक