राज्यपाल कोश्यारी यांना कोरोना, राज्याचं लक्ष एकनाथ शिंदेकडे मुंबईत येणार का गोव्यात?

मुंबईहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hinduhriday Samrat Balasaheb Thakre) यांच्या विचारांचा स्वतःला खरा वारसदार मानणाऱ्या शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदे यांनी दिलेल्या दणक्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २५ वर्षे राज्य आमचंच राहील असा दावा काही नेत्यांकडून केला जात असताना शिंदे यांच्या यॉर्करमुळे हे नेते त्रिफळाचीत झाल्याचे दिसत आहे.

राज्यात राजकीय भूकंप (Political earthquake) घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आज दुपारी आपल्या पाठिंब्याचे पत्र घेऊन एकनाथ शिंदे मुंबईत येणार होते परंतु राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाची लागण झाल्याने कोश्यारी हे आपले अधिकार गोव्याच्या राज्यपालांना देणार का हे पाहावे लागेल. जर एखाद्या राज्याचे राज्यपाल हे दहा दिवस सुट्टीवर असतील तर दुसऱ्या राज्यपालांकडे चार्ज देण्यात येतो. राज्यपाल्यांचा प्रभार दुसऱ्या राज्यपालांना देण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींकडे (President) असतो.