Prakash Ambedkar | शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ते सांगावे, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Prakash Ambedkar | सहा वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदान बंद होत आहे. त्यामुळे आम्ही पाच वाजता पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही शरद पवार यांना विचारू इच्छितो की, चार दिवसांपूर्वी त्यांनी राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना फोन का केला होता ? त्याचे कारण काय होते ? असे सवाल वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Alliance) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शरद पवारांना विचारले आहेत. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, राजनाथ सिंह यांच्यासोबत शरद पवार यांचे काय बोलणे झाले आहे हे आम्ही विचारू इच्छितो. राष्ट्रवादीच्या 5 जागांसंदर्भात चर्चा झालीय का ? किंवा एकनाथ शिंदे मुंबईच्या तीन जागा लढत आहेत, त्यासंदर्भात चर्चा झालीय का? किंवा उध्दव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झालीय का ?

जेव्हा महाविकास आघाडीसंदर्भात चर्चा चालू होती. तेव्हा आम्ही एक मुद्दा मांडला होता की, आपण धर्मनिरपेक्ष मतांवर जिंकणार आहोत. त्यासाठी आपल्याला धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्वासित केले. पाच वर्षे भाजपसोबत जाणार नसल्याचे सार्वजनिकरीत्या सांगितले पाहिजे, याचीही आठवण आंबेडकर यांनी करून दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन