आज भारत-वेस्ट इंडिज पुन्हा भिडणार, हा सामना कधी, कुठे आणि कसे कसा पहायचा ते जाणून घ्या

नवी दिल्ली –  भारत आणि वेस्ट इंडिज (India and West Indies) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या (ODI) मालिकेतील दुसरा सामना 24 जुलै रोजी पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर (Queen’s Park Oval ground) खेळवला जाईल. पहिला सामनाही याच मैदानावर झाला होता जो भारताने 3 धावांनी जिंकला होता. भारतीय संघ सध्या मालिकेत 1-0 ने पुढे आहे. आज टीम इंडियाने येथे विजय मिळवला तर वनडे मालिकाही (ODI Serise) जिंकेल. ही मालिका कोणत्याही खासगी टीव्ही वाहिनीवर प्रसारित होत नसल्याने लाइव्ह स्ट्रीमिंग (LIVE Streme) कसे पहावे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील या सामन्यात नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होईल तर पहिला चेंडू संध्याकाळी 7 वाजता टाकला जाईल. भारत आणि वेस्ट इंडिज मालिका प्रसारित करण्याचे अधिकार डीडी स्पोर्ट्सकडे (DD Sports) आहेत. त्यामुळे हा सामना डीडी स्पोर्ट्सवर प्रसारित होणार आहे.  तसेच तुम्ही Jio TV वर थेट सामन्याचा आनंद घेऊ शकता.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत:-

भारत : शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांपैकी), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल , अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडिज : निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शामर ब्रूक्स, केसी कार्टी, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडकेश मोती, कीमो पॉल, रोवमन पॉवेल, जेडेन सील्स.