Shirur LokSabha 2024 | एकच वादा शिवाजी दादा! आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची ‘या’ कार्यकर्त्यांनी घेतली शपथ 

पुणे | शिरूर लोकसभा ( Shirur LokSabha 2024) मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केलेली आहे. शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil ) अशी या मतदारसंघात लढत होत आहे. आढळरावांनी मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. खासदारपदी कार्यरत नसतनाही गेल्या ५ वर्षांत त्यांनी शिरूरवासींसाठी(Shirur LokSabha 2024)  केलेल्या कामाचे लोक कौतुक करताना दिसत आहेत. यादरम्यान जुन्नर तालुक्यात प्रचार करत आसतान शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची शपथ घेण्यात आली आहे.

जुन्नर तालुक्यातील प्रचारा दरम्यान भाजप नेत्या आशा बुचके यांच्या घरी शिवाजीराव आढळराव पाटील गेले  होते, यावेळी बेणके, सोनवणे, काळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी चहापानानंतर  आढळराव पाटील घरातून बाहेर पडण्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेत  ”हम सब साथ है” अशा घोषणा दिल्या. आढळराव पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला असून त्यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवायचं आणि 400 पार मध्ये  मोदींसाठी एक आपला खासदार द्यायचा अशी शपथ घेण्यात आली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले