Dilip Mohite Patil | समोरासमोर बसून पाच वर्षात काय काम केलं ते सांगा, मोहिते पाटलांचं कोल्हेंना ओपन चॅलेंज

Dilip Mohite Patil | गेल्या काही दिवसापासून शिरूर मधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अजितदादा गटाकडून जोरदार टिका केली जात आहे. यातच ज्या अमोल कोल्हे यांच्यासाठी मागच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी जीव तोडून काम केलं. खिशातून पैसे खर्च करून रात्रीचा प्रचार केला. त्या खासदाराने आम्हाला कधी चहाला सुद्धा बोलवलं नाही. अशी खंत खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी (Dilip Mohite Patil) व्यक्त केली. यावेळी मोहिते पाटलांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका देखील केली.

अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच मेहनत घेतली. परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं सुद्धा नाही. ज्या गावात आम्ही त्यांच्यासाठी प्रचार केला. त्या गावात ते पाच वर्षात फिरकलेच नाहीत. निधान आभार देखील मानायला त्या गावात जायला पाहिजे होते. परंतु ते देखील त्यांनी केलं नाही. मुळात हा नट आहे आणि नाटकं कसं रंगवायचं हे त्याच्याकडून शिकावं.  त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी समोरासमोर बसावं आणि पाच वर्षात काय काम केलं ते त्यांनी सांगावं. असेही दिलीप मोहिते पाटील म्हणाले.

आमच्याकडे हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकरांचे अनेक बैठका झाल्यात. त्यासाठी त्यांनी किती बैठका घेतल्या ? काय चर्चा केल्या. त्यात त्यांचं किती योगदान आहे. ते त्यांनी सांगावं. आज लोकांना ते खोटं सांगताहेत. भावनिक आव्हान करत आहेत. जर ते खरोखर शेतकऱ्याचे पुत्र असते तर त्यांनी खरी परिस्थिती सांगावी. आजच कांद्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ते सांगत आहेत.  गेल्या पाच वर्षात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला नाही का ?  गेल्या पाच वर्षांमध्ये दुधाचा प्रश्न निर्माण झाला नाही का ?   त्यावेळेला काय किती आंदोलन केली ?  त्याच्याकरता किती बैठका घेतल्यात ?  असा सवाल देखील त्यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा