भारताने इतिहास रचला, प्रथमच थॉमस कप जिंकला

पुणे –  बॅडमिंटनची प्रतिष्ठित स्पर्धा , थॉमस चषक (Thomas Cup) भारताने जिंकला आहे . भारताने प्रथमच (first time) ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने गतविजेत्या इंडोनेशियाला हरवून (Defeating Indonesia) थॉमस कप विजेतेपद पटकावत इतिहास रचला (History made). लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टी आणि किदाम्बी श्रीकांत यांनी भारताला चॅम्पियन केले आहे. थॉमस चषक विजेत्या संघाला क्रीडा मंत्रालयाने एक कोटी रुपयांचे अनुदान ( one crore rupees) जाहीर केले आहे. त्याचवेळी पीएम मोदींनी (PM Narendra Modi) विजेत्या संघाचे अभिनंदनही केले.

पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानी असलेला शटलर लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अँथनी सिनिसुका गिंटिंगचा (Anthony Sinisuka Ginting) पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satviksairaj Rankireddy)आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीने पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या केविन संजय (Kevin Sanjay) आणि मोहम्मद अहसान (Mohammed Ahsan)यांचा पराभव केला.

दुहेरीच्या सामन्यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान आणि केविन संजय यांचा 18-21, 23-21 आणि 21-19 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सात्विक आणि चिरागने रोमहर्षक पुनरागमन केले. दुसरा गेम बरोबरीत सुटला, मात्र येथून भारतीय जोडीने आपल्या बाजूने झुंज दिली. यानंतर या जोडीने तिसरा गेम 21-19 असा जिंकून सामना 2-1 असा जिंकला. या विजयासह भारताची अंतिम फेरीतील ( final round) आघाडी 2-0 अशी झाली आहे.