Navneet Rana | पोपटासारखे बोलणाऱ्यांना झापड बसली; नवनीत राणांबाबत खुशखबर देताना फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

Navneet Rana | भाजपाने अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी दिलेल्या नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित होते. त्याचा निकाल लागलेला नसतानाही भाजपाने त्यांना उमेदवारी दिल्याने विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निकाल देताना नवनीत राणा यांना दिलासा देत हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या जातप्रमाणपत्राबाबत जे लोक बोट उचलत होते, त्यांना सुप्रीम कोर्टाने उत्तर दिलं आहे. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरलं आहे. ३०० वर्षांपूर्वीचे कागदपत्रे मांडली. आता सत्याचा विजय झाला आहे. जे पोपटासारखे बोलत होते, त्यांना झापड बसली आहे. आता सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आहे. मतमोजणीच्या दिवशीही जनतेचा आशीर्वाद मिळेल, अशी अपेक्षा फडणवीसांनी यावेळी व्यक्त केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत