Video: स्वस्तात बाद झाल्यामुळे चिडला पाकिस्तानचा फलंदाज, भर मैदानात भिडले दोन क्रिकेटर्स

Marco Jansen Mohammad Rizwan Video: ICC ODI World Cup 2023 चा 26 वा सामना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa) यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र संघाची सुरुवात चांगली झाली नाही.

सलामीवीर अब्दुल्ला शफीक 9 धावांवर तर इमाम उल हक 12 धावांवर बाद झाला. यानंतर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि कर्णधार बाबर आझम मैदानात उतरले, पण त्याच दरम्यान मोहम्मद रिझवान पहिल्याच चेंडूवर आऊट झाला आणि मार्को जानसेन (Marco Jansen) आणि त्याच्यात काही मुद्द्यावरून वाद झाला. दोघांमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

वास्तविक, पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जानसेन यांच्यात जोरदार वादावादी झाली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात इमाम उल हक आऊट होताच मोहम्मद रिझवान क्रीजवर आला.

त्यामुळे मार्को जानसेनच्या पहिल्याच चेंडूवर तो थोडक्यात बचावला. मार्कोने पहिल्याच चेंडूवर रिझवानचा झेल सोडला. यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. मात्र, पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि जेराल्ड कोएत्झी यांनी हे प्रकरण शांत केले.

मोहम्मद रिझवान स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला
सुरुवातीच्या दोन धक्क्यांनंतर फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने पहिल्याच चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. रिझवानने मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला, पण फलंदाजीत तो काही विशेष खेळ दाखवू शकला नाही. रिझवानने 27 चेंडूंचा सामना करत 31 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 1 षटकारही लगावला.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या मुलाने मोठा गुन्हा केला नाही, समाजासाठी…”, सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या मंगेश साबळेंच्या आईची विनंती

‘गाथा नवनाथांची’ मालिकेत आरूष बेडेकर दिसणार बाल नागनाथांच्या भूमिकेत!

मोठी बातमी ! ड्रग्ज माफिया Lalit Patil प्रकरणात महिला पोलीस अधिकारी निलंबित