Amit Shah | अमित शाहांचा बनावट व्हिडिओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेस (युथ) सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेस (युथ) सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. यावेळी ज्या सोशल मीडियावरील अकाउंट्सवरून बनावट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे त्याची तपशीलवार माहितीही पोलिसांना देण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीशी संबंधित महाराष्ट्र काँग्रेसच्या युथ एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम अकाऊंटचा समावेश आहे.

गृहमंत्री अमित शाह ((Amit Shah) यांनी एससी/एसटी किंवा ओबीसी आरक्षण संपविण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही, हा व्हिडिओ खोटा आहे. यापूर्वीच्या भाषणांदरम्यान शाह म्हणाले होते की, सरकार स्थापन होताच मुस्लिम समाजाला दिलेले असंवैधानिक आरक्षण काढून टाकण्यात येईल. हा फेक व्हिडिओ महाविकास आघाडीतील युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांच्या विविध जिल्ह्यांचे एक्स, इंस्टाग्राम, फेसबुकपेज, तसेच विविध पक्ष, सेल आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या एक्स अकाउंटवरून प्रसारित करण्यात आला आहे. असा बनावट व्हिडीओ बनवून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भारतीय जनता पार्टीची बदनामी करून समाजातील विविध गटांमध्ये तेढ निर्माण होईल. त्यामुळे असे कृत्य करत जनमानसातील एकोपा व सामाजिक शांतता बिघडविण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी असेही मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन