केतकी चितळे प्रकरणावर  फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, …

कोल्हापूर –  प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Famous actress Ketki Chitale) ही सोशल मिडीयावर (Social media) चांगलीच सक्रीय असते. तिने केलेल्या काही पोस्टसवरून अनेकदा वाद देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आता देखील तिने एक पोस्ट केली असून या पोस्टवर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिलेली असतानाच दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या प्रकरणासंदर्भात भाष्य केलंय.कोल्हापूरमध्ये असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना या केतकी चितळे प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांबद्दल आपण काय भाषा वापरतोय याचं भान हे असलं पाहिजे,” असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.

पुढे बोलताना फडणवीस यांनी, “अलिकडच्या काळात सोशल मीडियावर अतिशय बेतालपणे बोललं जातं. अतिशय खालच्या दर्जाचे शब्द वापरले जातात. अशापद्धतीचे शब्द कोणीही वापरु नयेत. आता यासंदर्भात कायदा (Law) योग्य तो निर्णय घेईल,” असंही म्हटलं.