Jammu-Kashmir News | जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 10  भविकांचा मृत्यू 

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu-Kashmir News ) रियासी जिल्ह्यातील तेर्याथ गावाजवळ काल संध्याकाळी भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने दहा  यात्रेकरू ठार तर 33 जण जखमी झाले आहेत. या बसवर दहशतवाद्यांनी  केलेल्या गोळीबारात बस चालक जखमी होऊन त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली, असं  रियासीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी सांगितलं.  ही  बस शिवखोरी गुंफा येथून कटरा येथे परतत होती. जखमींना तेरियाथ, रियासी आणि जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं  आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir News) नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमीना आवश्यक ती  सर्व वैद्यकीय सुविधा आणि मदत देण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू , केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह  यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेला दहशतवादी हल्ला हे निर्घृण कृत्य  असून, मानवतेविरुद्ध गुन्हा आहे आणि त्याचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हंटलं आहे.

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी देखील या दशतवादी  हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियाप्रती शोक व्यक्त केला आहे. हल्ला झालेल्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा शोध घेण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांसह सुरक्षा दलांनी संयुक्त मोहीम उघडली असल्याचं त्यांनी सांगितलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!