Uddhav Thackeray | उबाठा उमेदवाराच्या प्रचारात मुंबई ब़ॉम्बस्फोटातील आरोपी पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला वेदना होत असतील

काँग्रेसच्या संगतीत राहून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटात मुंबईतील शेकडो निष्पापांचे जीव घेणाऱ्या आरोपींसोबत उबाठाचा प्रचार पाहून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला वेदना होत असतील, अशी टीका शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी केली. देशद्रोह्यांबरोबर संगनमत करुन प्रचार करणाऱ्या उबाठाला मुंबईकर धडा शिकवतील, असे ते म्हणाले.

उबाठाचे उत्तर पश्चिम मुंबई या मतदार संघाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा प्रचार १९९३ च्या ब़ॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा सक्रियपणे करत आहेत. त्याचबरोबर लष्कर भरतीचे पेपर फोडणारा आरोपी महेंद्र सोनावणे हा उबाठाचे शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांचा प्रचार प्रमुख आहे. भारतीय आणि लष्करात पाकिस्तानी धार्जिणे लोकांची भरती कशी करता येईल, असा या सोनावणे याचा डाव होता. हे सर्व देशद्रोही संजय राऊत यांच्यासोबत सत्कार करत फिरत आहेत, असा आरोप डॉ. वाघमारे यांनी केला.

उदधव ठाकरे ( Uddhav Thackeray) राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. मात्र त्यांचे खरे स्वरुप आता समोर आले आहे. यासंबधी फोटो आणि व्हिडिओचे पुरावे आहेत. अतिरेकी लोकांना सोबत घेऊन प्रचार करणाऱ्या उबाठा यांच्या नकली शिवसेनेने आता शिवसेना हा शब्द देखील वापरु नये. उबाठाचे संबध देशद्रोहयांशी आहेत. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे उबाठाला शिवसेना हे नाव देऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असे डॉ. वाघमारे यांनी यावेळी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती