Kasara movie | “कासरा” चित्रपटातून घडणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन!! ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च

शेतकऱ्याचं जगण्याच्या संघर्षाचं दर्शन घडवणाऱ्या कासरा चित्रपटाचा ट्रेलर  (Kasara movie) लाँच करण्यात आला आहे. शेती, शेतकरी या विषयावर आजवर अनेक चित्रपट झाले असले, तरी कासरा वेगळा ठरणार असून, सकस कथानक, उत्तम अभिनय असलेला हा चित्रपट २४ मे  (Kasara movie)रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्स या निर्मिती संस्थेनं कासरा चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रवी नागपूरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, प्रशांत नाकती, संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन, प्रशांत नाकती यांनी गीतलेखन केलं आहे. चित्रपटात स्मिता तांबे, गणेश यादव, जनमेजय तेलंग, तन्वी सावंत, राम पवार, प्रकाश धोत्रे, डॉ. वंदना पटेल, कुणाल सुमन, साई नागपूरे, देवेंद्र लुटे, विशाल अर्जून यांच्या भूमिका आहेत.

शेतकरी, शेती यांच्याशी संंबंधित बाजारपेठ, हमीभाव, तंत्रज्ञान असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळेच पारंपरिक शेती ते आधुनिक शेती या अनुषंगाने शेतकऱ्यांचं जगणं, संघर्षाची कथा कासरा हा चित्रपट दाखवतो. चित्रपटाचा टीजर, गाण्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलरमधून विषयाचं गांभीर्य दाखवतानाच चित्रपटाचं उत्तम कथानक, अनुभवी कलाकार, अभिनययासह चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचंही दिसतं. त्यामुळेच चित्रपटाविषयी आता उत्सुकता वाढली आहे. शेतकऱ्याचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी २४ मेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार