Jayant Patil | सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Jayant Patil | फक्त गुजरातच्याच कांद्याला निर्यातीची परवानगी देण्याचा निर्णय बॅकफायर होताच आज घाईगडबडीने केंद्र सरकारने ९९,१५० मॅट्रिक टन कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. हे प्रमाण फार कमी आहे, सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती. सरकारची घोषणा म्हणजे दर्यात खसखस असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारला जोरदार टोला लगावला.

आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते म्हणाले की, खरंतर ही बंदी सहा महिन्यांआधीच उठवायला पाहिजे होती पण आधी सरकारने मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार केला, नंतर गुजरातचा विचार केला आणि शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला आहे का अशी शंका येते.

नाशिक, नगर, पुणे या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ४०० पारची घोषणा करणाऱ्यांना १५० तरी मिळतील का अशी भीती वाटत आहे म्हणून हा निर्णय घेतला असावा असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा