Sunetra Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामार्फत होताच बारामतीत जल्लोष

Sunetra Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर आज राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब होताच बारामतीतील भिगवण चौकात फटाके फोडत गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

बुधवारी 12 जून रोजी अजित पवारांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्बत करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. तर सुनेत्रा पवार पराभूत झाल्या होत्या.

आता राज्यसभेवर गुलाल उधळण्यात सुनेत्रा पवार यशस्वी ठरतात की नाही? हे पाहावे लागेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप