Kalyaninagar Accident News | ‘त्यांनी’ आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्ब्यात फेकले, पुणे पोलीस आयुक्तांचा खळबळजनक खुलासा

कल्याणीनगर अपघात प्रकरणी ( Kalyaninagar Accident News) पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यामध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले गेले त्यावेळी या दोन वरिष्ठ डॉक्टरांनी फेरफार केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

आरोपीला वाचवण्यासाठी बल्ड सॅम्पल कसे बदलण्यात आले? ससूनच्या डॉक्टरांनी काय केलं? ते सर्व समोर आलय. पुणे पोलिसांनी या प्रकरणी आणखी दोघांना अटक केलीय. पुरावे नष्ट करण्यासाठी जे जे काही झालं, ते खूप धक्कादायक आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात खळबळजनक खुलासे केले आहेत. “19 तारखेला 11 वाजता अल्पवयीन आरोपीचे सूसन हॉस्पिटलमध्ये ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आले होते. जे आरोपीचे ब्लड सॅम्पल घेतले, ते त्यांनी डसबीनमध्ये फेकून दिले. त्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेऊन डॉक्टरने सील केले व त्यावर आरोपीचे नाव लिहून फॉरेन्सिकला पाठवून दिले. डॉ. श्रीहरी हळनोर तिथे सीएमओ होते. त्यांनी हे सर्व ब्लड सॅम्पल बदलले. डॉ. अजय तावरे HOD आहेत, त्यांचाही सहभाग यामध्ये होता” अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Kalyaninagar Accident News) यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप