वनडे विश्वचषकापूर्वी टीमला मोठा धक्का, स्पर्धेनंतर ‘हा’ स्टार खेळाडू घेणार निवृत्ती

एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होत आहे. या स्पर्धेच्या अगदी एक महिना आधी म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत सर्व संघांना अंतिम संघ जाहीर करण्याची मुदत देण्यात आली होती. जिथे भारताने मंगळवार, 5 सप्टेंबर रोजी विश्वचषक संघ निवडला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेनेही या मेगा स्पर्धेसाठी आपला संघ निवडला आहे. दरम्यान, एक मोठी बातमी येऊ लागली आहे, त्यानुसार एका धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केल्याची माहिती मिळाली आहे. त्याला आयसीसीने पुष्टी दिली आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनेही त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. आम्ही बोलत आहोत दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकबद्दल (Quinton De Kock).

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर डी कॉक या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करणार असल्याची माहिती क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या मॅगझिनने दिली आहे. मॅगझिनने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक एनोक एनक्वे यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, वनडे क्रिकेटला अलविदा करण्याचा डी कॉकचा निर्णय आम्हाला समजला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वनडे विश्वचषक संघही मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. डी कॉकचे नाव या संघात असले तरी हा त्याचा शेवटचा एकदिवसीय विश्वचषक असेल. क्विंटन डी कॉकने 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून वनडे पदार्पण केले होते आणि हा त्याचा तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय विश्वचषक असेल.

महत्त्वाच्या बातम्या-
सनातन धर्माच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या उदयनिधीच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडे तक्रार दाखल