हिजाब प्रकरणात कंगना रनौतची उडी; म्हणाली, हिंमत असेल तर…

मुंबई – सुरूवातील कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाबचा (Hijab) वाद सध्या महाराष्ट्रभर पसरला आहे. अल्पसंख्यांक समाजाचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणारे पक्ष आणि महाराष्ट्रातील काही मुस्लिम महिलाही हिजाबवरून चांगल्याचा आक्रमक झाल्या आहेत. नुकतेच पुण्यात आणि मालेगावात पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलनं आणि मेळावे भरवण्यात आले.

दरम्यान, देशभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी याला दडपशाहीचं नाव देतंय तर कोणी धर्माचं. मालेगावात हिजाबसाठी हजारो मुस्लिम महिला एकवटल्याचे पहायला मिळाले. पोलिसांचा विरोध झुगारून कल्लू स्टेडियम वर हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती दिसून आली.

या पार्श्वभूमीवर कथित पुरोगामी हे आता हिजाबचे समर्थन करताना दिसून येत आहेत तर अनेक विवेकवादी मंडळींनी शाळेत फक्त गणवेश घालूनच विद्यार्थ्यांनी यावे अशी मागणी केली आहे. दरम्यान, आता या वादात आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनेही (Kangana Raunt) उडी घेतली आहे. कंगनाने या प्रकरणी आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलंय.

तिने आपल्या इन्स्टाग्रामवर लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये इराणमधले 2 फोटो तिने शेअर केले आहेत. पहिल्या फोटो 1973 मधला आहे. यावर कंगनाने म्हटलंय की, 1973 मध्ये इराणी महिला बिकिनी घालायच्या. पण आता महिला बुरखा घातलेल्या दिसत आहेत. यावर कंगना म्हणाली आहे की “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता वावरून दाखवा.” कंगनाच्या या मताला काहींनी संमती दर्शवली आहे तर काहींनी त्याला विरोध केलाय. कंगनाची ही इन्स्टास्टोरी चर्चेत आहे.