Devendra Fadnavis | पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? फडणवीसांचा सवाल

Devendra Fadnavis | हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) हे पाकिस्तानचीच भाषा बोलत असूनही काँग्रेसशी आघाडी केलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या विषयावर अद्यापि गप्प आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपण वडेट्टीवार यांच्या आरोपाशी सहमत आहोत का, हे जाहीर करावे असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी दिले. मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा बजावण्यात ॲड.उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी बजावलेल्या भूमिकेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले होते. मात्र वडेट्टीवार हे निकम यांच्यावर बेछूट आरोप करत असताना मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा नेता पाकिस्तानधार्जिणी वक्तव्ये खुलेआम करत असताना उद्धव ठाकरे मात्र मूग गिळून गप्प आहेत. हेमंत करकरे हे अजमल कसाब च्या गोळीनेच हुतात्मा झाले हे न्यायालयातही सिद्ध झाले असताना वडेट्टीवार पाकची भाषा बोलत आहेत असा घणाघात फडणवीस यांनी केला. पाकिस्तानमधील कुणाच्या संपर्कात वडेट्टीवार आहेत असा सवालही त्यांनी केला.

मुंबई हल्ल्याबाबत न्यायालयात सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचा कट होता आणि अजमल कसाबच्या गोळीनेच हेमंत करकरे हुतात्मा झाले हे न्यायालयामध्ये सिद्ध होऊन पाकिस्तान तोंडघशी पडले होते याचीही आठवण श्री. फडणवीस यांनी करून दिली. शेकडो मुंबईकरांचा जीव घेणा-या अजमल कसाब सोबत काँग्रेस असून भाजपा ॲड. उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी आहे असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर

Devendra Fadnavis | आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल

Shirur LokSabha | कोल्हे कवडीचं काम करत नसेल तर जनता त्यांना कवडीमोल करेल, दरेकरांनी साधला निशाणा