प्रसिद्ध कॉमेडियन Kapil Sharma सोबत धोखाधडी, कार डिझायनरकडून ५ कोटींची फसवणूक

Fraud With Kapil Sharma: कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) नेहमीच चर्चेचा भाग असतो. कपिल त्याच्या विनोदी शैलीने लाखो लोकांचे मनोरंजन करतो. दरम्यान, आला कपिल शर्मा ईडीकडे पोहोचला आहे. कार डिझायनर दिलीप छाब्रियाने आपली फसवणूक केल्याचे कपिल शर्माचे म्हणणे आहे. दिलीपला व्हॅनिटी व्हॅनची ऑर्डर दिली होती आणि ती त्याने आणून दिली नाही, असा आरोप कॉमेडियनने केला आहे.

कपिल शर्माचे (Kapil Sharma) म्हणणे आहे की, आधी कार डिझायनरने डिलिव्हरी केली नाही आणि यासाठी त्याला जबाबदार धरायला सुरुवात केली. याशिवाय दिलीप छाब्रिया याने त्याच्याकडून पैसे उकळण्याचा खूप प्रयत्नही केला, असा आरोप कपिलने केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात कपिल शर्माचे अधिकृत प्रतिनिधी मोहम्मद हमीद यांचे जबाब नोंदवले आहेत.

कॉमेडियन कपिल शर्माचा अधिकृत प्रतिनिधी मोहम्मद हमीद याच्या जबाबाची नोंद कार डिझायनरविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राचा भाग म्हणून करण्यात आली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी आरोपपत्राची दखल घेत छाब्रिया याच्यासह अन्य सहा आरोपींना समन्स बजावले. न्यायालयाने सर्वांना 26 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीचा खटला आरोपींविरुद्ध नोंदवलेल्या तीन एफआयआरवर आधारित आहे, ज्यामध्ये कपिल शर्माच्या फसवणुकीचाही समावेश आहे.

ईडीसमोर सादर केलेल्या निवेदनात कपिल शर्माच्या प्रतिनिधीने म्हटले आहे की, 2016 मध्ये कपिल शर्माने व्हॅनिटी व्हॅनसाठी छाब्रिया याच्याशी संपर्क साधला होता. मार्च 2017 मध्ये, K9 प्रॉडक्शन आणि दिलीप छाब्रिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड (DCDPL) यांच्यात व्हॅनिटी व्हॅनच्या डिलिव्हरीसाठी 4.5 कोटी रुपये (कर वगळून) करार झाला. कराराच्या अटींनुसार, कपिलच्या प्रॉडक्शन हाऊसने 5.31 कोटी रुपये (करांसह) दिले. पण डीसीडीपीएलने शर्माला ना व्हॅनिटी व्हॅन दिली ना पैसे परत केले.

महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar | ‘आयत्या बिळावर नागोबा’ असणारे हे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडणारे ‘गद्दार’ आहेत

Supriya Sule | मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत सुप्रिया सुळे यांनी वेधले लक्ष

Ajit Pawar | पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो… आजही आहोत आणि भविष्यातही राहू