चमत्कार! कर्नाटकात सापडली हुबेहुब अयोध्येतील रामलल्ला सारखी भगवान विष्णूची मूर्ती, 1000 वर्ष जुनी असल्याचा दावा

Ram statue : अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या रामलल्लाच्या मूर्तीशी (Ram statue) मिळतीजुळती एक मूर्ती कर्नाटकातील कृष्णा नदीत सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, रायचूर जिल्ह्यातील कृष्णा नदीत भगवान विष्णूची (Lord Vishnu) एक प्राचीन दशावतार मूर्ती सापडली आहे, जी 11व्या किंवा 12व्या शतकातील असू शकते. रामललाच्या प्रतिमेप्रमाणे या मूर्तीतही भगवान विष्णूच्या मूर्तीभोवती दशावतार सुंदर कोरलेले आहेत.

योगायोग की चमत्कार?
प्राचीन मूर्ती पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, या 1000 वर्ष जुन्या मूर्तीचे रामललाशी साम्य असणे हा एक अद्भुत योगायोग आहे. विशेष म्हणजे या मूर्तीसोबत एक प्राचीन शिवलिंगही सापडले आहे.

ही मूर्ती गर्भगृहाचा भाग असावी
कृष्णा नदीत सापडलेल्या मूर्तीबद्दल माहिती देताना रायचूर विद्यापीठातील प्राचीन इतिहास आणि पुरातत्व विभागाच्या प्राध्यापिका डॉ. पद्मजा देसाई म्हणाल्या की, ही मूर्ती मंदिराच्या गर्भगृहाचा भाग असावी. मंदिरातील तोडफोडीनंतर ती वाचवण्यासाठी मूर्ती नदीत फेकली असावी, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. या विष्णू मूर्तीच्या नाकाला किंचित इजा झाली आहे.

पुतळ्यात काय विशेष आहे
डॉ.पद्मजा देसाई यांच्या म्हणण्यानुसार, या विष्णूच्या मूर्तीमध्ये रामलल्लाप्रमाणे खास नक्षीकाम करण्यात आले आहे. दशावताराच्या रूपात मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, राम, परशुराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांच्या अवतारांनी प्रभामंडल सुंदरपणे सजवलेला आहे. विष्णूच्या उभ्या असलेल्या मूर्तीला चार हात आहेत, दोन हात शंख आणि चक्राने सुसज्ज आहेत. मात्र, या मूर्तीवर गरुडाचे चित्रण नाही.

महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar | ‘आयत्या बिळावर नागोबा’ असणारे हे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडणारे ‘गद्दार’ आहेत

Supriya Sule | मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत सुप्रिया सुळे यांनी वेधले लक्ष

Ajit Pawar | पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो… आजही आहोत आणि भविष्यातही राहू