खिचडी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या सुरज चव्हाण यांचा आदित्य ठाकरेंना वाटतोय अभिमान

Suraj Chavan – करोना काळातील कथित खिचडी वितरण गैरव्यवहार प्रकरणी ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना ईडीनं १७ जानेवारी रोजी अटक केली. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाण यांचा अभिमान वाटत असल्याचं नमूद केलं आहे.

आदित्य ठाकरेंनी या पोस्टमध्ये सूरज चव्हाण यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. निर्लज्ज हुकूमशाही आणि त्यांच्या यंत्रणेसमोर न झुकणाऱ्या अशा निष्ठावान व्यक्तीचा सहकारी असण्याचा मला अभिमान आहे. सूरज चव्हाण हे कायमच सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्या राज्यघटनेसाठी उभे राहिले आहेत. असे देखील त्यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सत्तेकडून आलेले प्रलोभनांचे प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावले. त्यामुळेच त्यांना अशा प्रकारे त्रास दिला जात आहे.आम्ही लोकशाहीसाठी या काळ्या कालखंडाशी लढा देऊ आणि विजयी होऊ. आपल्या राज्यातील हुकूमशाही सत्तेच्या कृती जग पाहात आहे”, असंही त्यांनी पोस्टमध्ये शेवटी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

‘हे’ आहेत जगातील सर्वोत्तम तांदूळ, तांदळाची ‘ही’ भारतीय जात पहिल्या क्रमांकावर

अरे हे काय? इशानसाठी देशापेक्षा IPL महत्त्वाचे! मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी टीम इंडियातून बाहेर

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?