कर्नाटकात कुमारस्वामी किंगमेकर बनण्याची शक्यता; मात्र प्रतिक्रिया देताना म्हणाले…

Karnataka Election Results : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election Vote Counting) मतमोजणीस सुरुवात झाली आहे. एकूण 224 मतदारसंघांचे निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 2,615 उमेदवार उभे होते. त्यामुळे या सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. मात्र, जेडीएस हा पक्ष किंगमेकरची भूमिका निभावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात 200 जागांसाठीचे प्रारंभिक कल आले आहेत. यामध्ये भाजप-कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसची काहीशी सरशी पाहायला मिळत असली तरीही भाजप मध्ये आणि कॉंग्रेसमध्ये फारसे अंतर नसल्याचे चित्र आहे.

राजकीय जाणकारांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार निकाल त्रिशंकू स्वरूपाचा सुद्धा लागू शकतो अशा वेळी जेडीएस महत्वाची भूमिका बजावू शकतो. या पार्श्वभूमीवर या पक्षाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांची प्रतिक्रिया आली आहे. आतापर्यंत माझ्याशी कुणीही संपर्क केलेला नाही. एक्झिट पोलनुसार आपला वेगळ्या पर्यायांची गरज राहणार नाही. त्यामुळे निकाल काय लागतो ते पाहुयात. आणखी २-३ तासात चित्र स्पष्ट होईल. मी माझ्यासाठी कोणताही प्लॅन केलेला नाही. एक्झिट पोलनुसार माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही. आम्हाला चांगल्या निकालाची आशा आहे. आमचा एक छोटा पक्ष आहे. त्यामुळे आमची कोणतीही मागणी नाही.असे ते म्हणाले.