शिवरायांसारखा सोन्याचं नक्षीकाम असलेला पोशाख घालून वाघनखं आणायला लंडनला जाणार- मुनगंटीवार

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. अशातच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Shudir Mungantiwar) यांनी सोन्याचं नक्षीकाम केलेला ड्रेस घालून वाघनखं आणायला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ठार मारण्यासाठी वापरलेली वाघनखं ही लंडनवरुन परत आणणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. नोव्हेंबरमध्ये ही वाघनखं भारतात येणार आहेत. याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘आमच्या शिवबाची कीर्ती लंडनपर्यंत आहे. तिथे अनेक शिवभक्त आमच्या कार्यक्रमात फेटे बांधून यात्रा करणार आहेत. हे कळलं तेव्हा मला फार आनंद झाला. एक पुण्याचा शिवभक्त आहे, तो माझ्यासाठी विशेष पोशाख बनवित आहे. हा पोशाख घालून तुम्ही गेलं पाहिजे असा आग्रह त्याचा आहे. साठीत जाणाऱ्या एका शिवभक्ताचं प्रेम बघून मी भारावलो आहे’.

‘शिवाजी महाराज ज्या प्रकारचा पोशाख परिधान करायचे, त्या प्रकारचा पोशाख आम्हाला दिला जाणार आहे. त्याच्यावर सोन्याचं नक्षीकाम असणार आहे आणि तो पोशाख त्यांनी एखाद्या संग्रहालयात ठेवायला सांगितला आहे. सुरज, चांद मीट गये, तब भी मेरे शिवबा का नाम रहेगा’, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपुरात ते माध्यमांशी बोलत होते.

https://youtu.be/V2CJh5NTALo?si=2M0cjG7pZl00qALS

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण