शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची करावाई होणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष

नवी दिल्ली-  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदारांसह भाजपाच्या मदतीने राज्यात युतीचं सरकार स्थापन केलं. नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) स्थापन झालं असलं, तरी अद्याप याप्रकरणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल याचिकांवर निर्णय आलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच राज्य सरकार आणि शिवसेनेच्या पुढील भवितव्याचा फैसला होणार असून आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

दरम्यान,शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने आम्ही म्हणजेच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी व्हीप मोडला म्हणून त्यांच्यावर करावाई करावी अशी याचिका शिवसेनेच्या वतीने न्यायालयात (Court) दाखल करण्यात आली आहे.

शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या खंडपीठाच्या निर्णयावरच सध्याच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने या सुनावणीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागलं आहे. या निर्णयानंतरच राज्याच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असून आज नेमकं काय होणार याची उत्सुकता आहे.