Mohsin Shaikh Case : पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणात धनंजय देसाईसह २० आरोपींची निर्दोष मुक्तता  

पुणे – संपूर्ण पुण्याला हादरवून सोडणाऱ्या आयटी इंजिनियर मोहसीन शेख हत्या प्रकरणातील (IT engineer Mohsin Shaikh murder case) सर्व २० आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. मोहसीन शेख हत्या प्रकरणात हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाई (Hindu Rashtra sena Chief Dhananjay Desai) आणि इतर २० जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. जून २०१४ साली पुण्यातील हडपसर परिसरात मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे निर्देश दिले आहेत.

जून २०१४ मध्ये सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट शेयर करण्यात आल्यामुळं पुणे शहरातील अनेक भागांमध्ये तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावानं पीएमपीएलच्या बसगाड्या जाळल्या होता. त्यानंतर महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट शेयर केल्याच्या संशयावरून मोहसीनची आरोपींकडून हत्या करण्यात आली होती.