Kavya Maran | हैदराबादचा फायनलमध्ये प्रवेश करताच काव्याने आनंदाने मारली उडी, टीम मालकिणीचा आनंद गगनात मावेना

Kavya Maran | सनरायझर्स हैदराबादने शुक्रवारी राजस्थान रॉयल्सवर 36 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या क्वालिफायर-2 मध्ये नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानला 20 षटकांत सात गडी गमावून 139 धावा करता आल्या. हैदराबादचा संघ 2018 नंतर कधीही विजेतेपदाच्या लढतीत उतरला नव्हता आणि आता सहा वर्षांनंतर तो अंतिम सामना खेळणार आहे. विजयानंतर संघ मालकीण काव्या मारनने (Kavya Maran) आनंदाने उड्या मारल्या.

आयपीएलच्या प्लेऑफमधील राजस्थानचा सहावा पराभव
आयपीएलच्या प्लेऑफमधील 11 सामन्यांमधला राजस्थान संघाचा हा सहावा पराभव आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा राजस्थान हा सहावा संघ आहे. प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने गमावण्याचा अवांछित विक्रम आरसीबीच्या नावावर आहे, ज्याने 16 सामन्यांमध्ये 10 सामने गमावले आहेत, तर दुसऱ्या स्थानावर सीएसके संघ आहे ज्याने 26 प्लेऑफ सामन्यांमध्ये नऊ सामने गमावले आहेत. दुसरीकडे, हैदराबादचा संघ तिसऱ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. हैदराबादचा संघ 2016 मध्ये पहिल्यांदा विजेतेपदाच्या सामन्यात पोहोचला होता, त्यावेळी संघाने विजेतेपद पटकावले होते.

काव्या मारनने आनंदाने उडी मारली
विजयानंतर सनरायझर्सची मालकीण काव्या मारनला आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती संघ व्यवस्थापनाच्या इतर सहकाऱ्यांना मिठी मारताना दिसली. तिची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की सुरुवातीला ती तणावात दिसत होती पण टीम जिंकताच ती आनंदाने उड्या मारू लागली. काव्या मारनची ही प्रतिक्रिया चाहत्यांना खूप आवडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप