संजय राऊत हिजाब घालून पळून जाऊ शकतो, लूक आऊट नोटीस काढली पाहिजे – राणे 

मुंबई – खासदार संजय राऊतांचे अत्यंत निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक करण्यात आली आहे. BMC कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई केली आहे.(BMC Covid Scam Case).  खासदार संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईत अनेक ठिकाणी जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आले होते. त्यावेळी मुंबई महापालिकेकडून कोविड सेंटर्सचे कॉन्ट्रॅक्ट पात्रता नसलेल्या लोकांना देण्यात आले होते. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, जेवढ्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले आहेत. त्या कोणत्याही कंपन्या अनुभवी नव्हत्या. तसेच, त्या कोवि़च्या काही काळापूर्वीच स्थापन झाल्या होत्या. अनेक नियम डावलून या कंपन्यांना महापालिकेच्या वतीनं कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले होते.

दरम्यान, या कारवाई नंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सुजीत पाटकर हा संजय राऊत यांचा पार्टनर आहे. संजय राऊत हा चोर आहे. सुजीतचा सगळा पैसा संजय राऊतकडे होता. संजय राऊत जास्त दिवस बाहेर राहणार नाही. कैदी नंबर 8969 असेल. संजय राजाराम राऊत याने तयारी करावी” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

केंद्र सरकारवर रोज आरोप करायचे. उद्धव ठाकरेंचा कामगार आता आत गेलाय. संजय राऊत हा फरार होऊ शकतो, देश सोडू शकतो. त्यामुळे लूक आऊट नोटीस काढली पाहिजे” अशी मागणी नितेश राणे यांनी केली. संजय राऊत हिजाब घालून पळून जाऊ शकतो. उलटी गिनती सुरू झालीये. कर नाही तर डर कशाला? काही झालं तरी कारवाई होणार चोराचा पर्दाफाश होणार  असं नितेश राणे म्हणाले.