IND vs PAK: ‘हा कोणता शॉट…’, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली आऊट झाल्यानंतर गौतम गंभीर संतापला

IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान संघात (India vs Pakistan) पल्लेकल्ले येथे झालेला आशिया चषक सामना (Asia Cup 2023) पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २६६ धावाच करता आल्या. उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि इशान किशन यांना वगळता भारताचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. यात रनमशीन विराट कोहली याचाही समावेश आहे. विराट ७ चेंडूंवर ४ धावा करत शाहीन आफ्रिदीच्या भेदक गोलंदाजीवर बाद झाला. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) विराट कोहली (Virat Kohli) ज्या प्रकारे बाद झाला त्यामुळे खूपच निराश दिसत होता. त्याने कोहलीच्या शॉट निवडीवर टीका केली.

स्टार स्पोर्ट्सवर गंभीर म्हणाला की, हा कोणता शॉट होता, ना फॉरवर्ड ना बॅकवर्ड. शाहीन आफ्रिदीसारख्या खेळाडूला खेळवल्यावर तेच मिळते. पुढे जायचे की मागे जायचे हेच कळत नाही. मात्र, कॉमेंट्रीमध्ये विराटवर झालेल्या चर्चेदरम्यान वकार युनूस म्हणाला, ‘तो थोडा दुर्दैवी होता. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडननेही वकार युनूसच्या विधानाशी सहमती दर्शवली.’

येथे वाचा आणखी बातम्या-

भारत वि. पाकिस्तान सामन्यात पावसाचा विजय, इशान आणि हार्दिकच्या झुंजार खेळी पाण्यात

भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द, मात्र ‘या’ तारखेला पुन्हा भिडू शकतात संघ! जाणून घ्या समीकरण

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे