Ketaki Chitale | ‘हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,’ अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Ketaki Chitale | भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी रविवारी (०९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. यासह त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. नंतर अनेकांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच अभिनेत्री केतकी चितळे हिने पंरप्रधानांसाठी केलेली अभिनंदनपर पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकी कायमच चर्चेत असते. तसेच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला तुरुंगात देखील जावं लागलं आहे. पण तरीही ती तिची स्पष्ट मतं सोशल मीडियावर कायमच मांडत असते. सध्या केतकीने केलेली पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आलीये.

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने पंतप्रधानांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यावर तिने ‘हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी’ असं कॅप्शन लिहिलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी आक्षेपार्ह कमेंट्स देखील केलेल्या आहेत. त्यामुळे केतकीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप