केकेआरने 10 कोटी देवून दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूला सामील केले आपल्या ताफ्यात 

Mumbai –  इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये अष्टपैलू शार्दुल ठाकूर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध खेळताना दिसेल. IPL 2022 पूर्वीच्या मेगा लिलावात त्याला दिल्ली कॅपिटल्सने (DC) 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, सोमवारी केकेआरने डीसीकडून  त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

शार्दुल ठाकूर सध्या टीम इंडियासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दिल्लीपूर्वी, तो चेन्नई सुपर किंग्स (CSK), रायझिंग पुणे सुपरजायंट्स (RPS) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्याकडून आयपीएलमध्ये खेळला होता. चेन्नईसाठी त्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. IPL 2022 च्या मोसमात ठाकूरने 14 सामन्यात 9.79 च्या इकॉनॉमीने 15 विकेट घेतल्या. तो 2017 पासून नियमितपणे आयपीएल खेळत आहे आणि त्याच्या गोलंदाजीची इतकी खराब कामगिरी कधीही झाली नाही. फलंदाजीत त्याने सुमारे 138 च्या स्ट्राइक रेटने 120 धावा केल्या.

2023 मध्ये आयपीएल होम अॅड अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शार्दुल ठाकूरची त्याच्या घरच्या मैदानावरची कामगिरी दिल्ली कॅपिटल्स थिंक टँकने लक्षात घेतली असेल. तिथे खेळल्या गेलेल्या अर्धा डझन आयपीएल सामन्यांमध्ये ठाकूरने 20 षटकात फक्त तीन बळी घेतले आणि 10.95 च्या इकॉनॉमी रेटने 209 धावा दिल्या.