Archana Patil | अर्चना पाटील यांना मिळाला मुस्लिम समाजाचा पाठींबा! मल्हार पाटलांनी दर्गाहला अर्पण केली चादर

Archana Patil | लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराणे वेग घेतला आहे. देशासह मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांना विजयी करावे, असे आवाहन युवानेते मल्हार पाटील यांनी केले.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना  पाटील यांच्या प्रचारार्थ युवानेते पाटील यांनी परंडा शहराचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. तसेच सुफीसंत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन यांच्या दर्गाहला फुलांची चादर अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी मुजावर समाजाच्या वतीने पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी भाषणात बोलताना महायुतीच्या उमेदवार पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली.

महायुती सरकारच्या कार्यकाळात  राणा दादांनी आपल्या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. मात्र‌ केंद्रातील विकास निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार असणे गरजेचे आहे.. म्हणूनच सर्वांनी ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे अशी विनंती मल्हार पाटील यांनी यावेळी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?