Dagdusheth Ganpati: ‘दगडूशेठ’ला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य

Dagdusheth Ganpati: सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Dagdusheth Halwai Ganpati Temple) आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या ५० लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा सारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांचे शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते.

दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल २५० महिला व १०० पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ३५०० किलो गुलछडी, ८०० किलो झेंडू, १२० किलो कन्हेर फुले, १ लाख गुलाब, ७० हजार चाफा, १०० कमळे, १ लाख लिली, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा