Pune विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास करणारे बारामतीकर विक्रम काळे यांचं सेट परीक्षेत यश…!

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) जयकर ग्रंथालयात अभ्यास करणारे बारामतीचे सुपुत्र विक्रम काळे (Vikram Kale) यांनी सेट – २०२२ परीक्षेत घसघशीत यश संपादीत केले आहे. त्यांनी समाजशास्त्रे (सोशल सायन्सेस) या विषयात अतिशय चांगले मार्क्स मिळवून मार्कांचा एक नवीन उच्चांक देखील स्थापित केला आहे.

या संदर्भात बोलताना काळे म्हणाले की “मुळात लहानपणापासून मला शिक्षक,प्राध्यापक आणि समाजातील विचारवंत लोकांविषयी आदर वाटत होता.आपणही त्यांच्या सारखं ज्ञानदानाच काम करावं हे माझं स्वप्न होत.म्हणून त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला आणि त्याची आज फलप्राप्ती झाली.माझ्या या यशात माझे कुटुंबीय,माझे गुरुवर्य प्रा.महादेव नरवडे सरांचं आणि जीवश्च – कंठश्च मित्र हृषिकेश जगदाळे यांचा मोलाचा वाटा आहे.

तर काळेंच्या यशाविषयी बोलताना प्रा. नरवडे म्हणाले की “मला नेहमीच विक्रम काळे (Pune News) यांच्या व्यक्तिमत्त्वात वेगळा स्पार्क दिसतं होता.त्यामुळे त्यांनी अभ्यास करून नेट – सेट परीक्षा पास कराव्यात हे आतून मला वाटतं होतं.आज ते स्वप्न फळाला आलं असल्यामुळे मला निश्चितच खूप आनंद होतो आहे.”आपला मास्तर” या आमच्या विद्यार्थीकेंद्री अभ्यास चळवळीचा हा पहिला निकाल मला आणि माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा देणारा ठरेल यात शंका नाही.

यावेळी उपस्थित मित्रांनी मिळून प्रचंड जल्लोष केला. यापुढेही आपण जोमाने अभ्यास करून विविध परीक्षांचं शिखर सर करू असंही काळे पुढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा