Madhav Bhandari | निष्ठावान माधव भांडारींच्या मुलाची पोस्ट चर्चेत; अपेक्षित फळ न मिळाल्याची मांडली व्यथा!

Madhav Bhandari : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा मध्ये मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांमधून नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखल होत असल्याचं दिसत आहे. त्यावर येणाऱ्या लोकांना दिलेल्या संधींमुळे पक्षातल्या निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधकांकडून केली जात आहे. यातच आता भाजपाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari) यांचे पुत्र चिन्मय भांडारी ( Chinmay Bhandari) यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

काय आहे पोस्टमध्ये?
चिन्मय भांडारी यांनी या पोस्टमध्ये त्यांचे वडिल अर्थात माधव भांडारी यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाविषयी आणि त्यांनी पक्षासाठी केलेल्या संघर्षाविषयी सांगितलं आहे. त्याचबरोबर माधव भांडारी यांनी आयुष्यभर पाळलेल्या तत्वांविषयीही त्यांनी नमूद केलं आहे. मात्र, यानंतर त्यांनी पक्षाकडून माधव भांडारींना जे अपेक्षित फळ मिळायला हवं होतं, ते मिळालं नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

माधव भांडारींचं नाव आजपर्यंत १२ वेळा विधानसभा किंवा विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत आलं, पण बाराही वेळा त्यांना तिकीट मिळालं नसल्याची खंत या पोस्टमध्ये मांडण्यात आली आहे. दरम्यान, या पोस्टमुळे भाजप विरोधकांना चांगलाच मुद्दा मिळाला असून भाजपची मात्र गोची झाल्याचे चित्र आहे.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज