Maharashtra Politics | ‘आमदारांनी राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेने सोडलं नसल्यानं त्यांना अपात्र ठरवता येणार नाही’

Maharashtra Politics  : सत्ताधारी आघाडीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडे शरद पवार गटापेक्षा बहुमत होतं, असं निरीक्षण नोंदवत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अजित पवार यांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवर झालेल्या सुनावणीनंतर काल त्यांनी हा निर्णय (Maharashtra Politics) दिला. दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करणाऱ्या याचिकाही अध्यक्षांनी फेटाळल्या. आमदारांनी राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेने सोडलं नसल्यानं त्यांना अपात्र ठरवता येणार नाही. विभाजनाच्या घडामोडी 30 जून ते 2 जुलै या काळात घडल्या. मात्र त्या पूर्णपणे पक्षांतर्गत घडामोडी होत्या. त्यानंतर आमदार अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांमध्ये विभागले गेले, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून आपण या घडामोडी सातत्यानं जवळून बघितल्या आहेत. आमदार सदस्य एकत्र असणं,त्यांनी विभाजित होऊन नवीन आघाडी तयार करणं या साऱ्या बाबी म्हणजे राजकारण आहे. युती-आघाडी होतात किंवा तुटतात, मात्र सर्वच कृत्ये किंवा आचरण हे पक्षांतर मानले जाऊ शकत नाही. पक्षातील मतभेद दाबण्यासाठी 10 व्या परिशिष्टाचा वापर करता येणार नाही, असंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज